महाविद्यालया द्वारे दिनांक 10 जानेवारी 2020 ते 16 जानेवारी 2020 दरम्यान बि. एस. डब्ल्यू. चतुर्थ सत्र व एम. एस. डब्ल्यू. द्वितीय सत्रा च्या विद्यार्थ्यांकरीता, जामणी ता. जि. वर्धा, ह्या गावामधे ग्रामीण शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिराअंतर्गत सहभागी ग्रामिण मुल्यावलोकन (PRA) च्या माध्यमातून गावाची सर्वकश माहिती गोळा करण्याच्या पद्धतीचे तसेच विकासाचा आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याच प्रमाणे अंधश्रद्धा निर्मुलन, वृक्षसंवर्धन, स्त्रिसक्षमिकरण, बेटी बचाव ईं. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. तसेच श्रमदान व ग्रामस्वच्छता हे कार्यक्रम विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने राबविण्यात आले. त्याच प्रमाणे दररोज सकाळी प्रभातफेरी पथनाट्ये व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध समस्यांवर ऊदबोधन करण्याची संधी प्रदान करण्यात आली. ज्याद्वारे विद्दयार्थ्यांंमधे आत्मविश्वास निर्माण करण्यात आला.